मंगलवार, 15 जनवरी 2013

बिर्ला कॉलेज परिसरातील चाळ नावाची संस्कृति नष्ट होण्याच्या मार्गावर

कल्याण, 16 डिसेंबर – चाळ नावाची वाचाळ वस्ती म्हणजेच महाराष्ट्रातील मुंबई नगरीची शान. परंतु आता ह्याच मुंबई नगरीत चाळ नावाची वाचाळ वस्त नष्ट होत आहे. ही एक काळजी करण्याची बाब आहे. एवढचं काय तर आता मुंबई नगरी बरोबर ठाणे जिल्ह्यातील चाळी देखील नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

कल्याण पश्चिमे कडील खास करुन बिर्ला कॉलेज परिसरातील चाळ नावाची मराठ-मोळी संस्कृति नष्ट होण्याचा मार्गावर आहे. ह्याचे कारण एकदम सोपे आहे, कारण सध्या बिर्ला कॉलेज परिसरातील रस्ते मोठे करण्याची योजना जोरात सुरु झाली आहे व रस्ते मोठे करण्या संबंधी बोर्ड प्रत्येक विभागात लावले आहेत. जर ह्या विभागातील रस्ते मोठे झाले तर भविष्यात येथील चाळी रि-डेवल्पमेंट मध्ये जातील आणि बिल्डरांना एफएसआई वाढवून घेण्यास नक्कीच ह्याचा फायदा होईल. बिर्ला कॉलेज परिसरात जय भवानी नगर, अनुपम नगर, सह्याद्री नगर 1-2, नवनाथ नगर, बी के नगर, सह्याद्री नगर 3, सम्राट नगर, भोईर वाडी व इतर चाळी चे विभाग प्रामुख्याने मोडले जातात.

चाळ नावाची वाचाळ वस्ती म्हणजेच मराठी संस्कृतिचा अभिमान व ह्याच अभिमानामुळे ह्या नगरातील नागरिक दत्त जयंती, मकरसंक्रात, होळी, गुडी पाडवा, राम नवमी, रक्षाबंधन, गोपाळकाला, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा-दिवाळी, शिवजंयती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सारखे सण मराठ-मोळ्या शैलीत मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरे करतात, परंतु आजच्या मॉर्डन युगात सर्व काही नविन करण्याच्या प्रयत्नामुळे, सध्या ह्या विभागातील रस्ते सुधारण्याचा उपक्रम जोरात सुरु आहे व भविष्यात ह्या विभागीतल चाळीचे रि-डेवल्पमेंट नक्कीच होऊ शकते ह्या बद्दल तर काही शंका करण्याचे कारणच नाही आहे. म्हणूनच बिर्ला कॉलेज परिसरातील चाळ नावाची संस्कृति नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

ह्या विभागात नवीन रस्ते बनविण्याचा उपक्रम सुरु झाल्या पासून ह्या परिसरातील चाळीतील घरांचे भाव देखील बिल्डिंगमधील फ्लैटच्या किमती सारखे वाढू लागले आहेत आणि सध्या 200 ते 250 स्केअर फुटाचा रुम देखील 10 ते 15 लाख रुपयात विकला जात आहे. ह्या विभागातील घरे विकून रहिवाशी कल्याण पूर्वेकडे 3-4 लाख रुपयाच्या किमंतीत चाळी मध्ये रुम घेत आहेत. त्याच बरोबर काही रहिवाशी तर आपली घरे विकून शहाड, आंबिवली, टिटवाळा येथे देखील 2-3 लाख रुपयाच्या किमंतीत चाळी मध्ये नवीन रुम घेत आहेत.

कोई टिप्पणी नहीं: