शुक्रवार, 28 दिसंबर 2012

नविन वर्षात बी के नगरच्या चाळीवर बुलडोजर फिरणार ......काय?

कल्याण – नवीन वर्ष येणार म्हणून त्याचे स्वागत करण्यासाठी देशा-विदेशात देखील एकदम धूमधडाक्याचे आनंदी वातावरण 25 डिसेंबर क्रिसमस च्या सणा पासून सुरुवात होते, परंतु ह्या वेळी कल्याण मधील, बिर्ला कॉलेज, आरटीओ स्थित बी के नगर मधील रहिवाशांची झोपच उडाली आहे व सर्व रहिवाशां मध्ये नाराजगी चे वातावरण पसरले आहे.

सध्या बिर्ला कॉलेज, आरटीओ जवळील बी के नगर विभागात एक चर्चा सुरु आहे कि नविन वर्षात रस्ता मोठा करण्याच्या उपक्रमा अंतगर्त बी के नगर च्या काही चाळी वर बुलडोजर फिरणार आहे ? ह्या संबंधी चर्चेचे कारण एकदम साधे व सोपे आहे कि प्रभाग 14, बिर्ला कॉलेज विभागात मोठे रस्ते करण्याचा नवा उपक्रम सुरु झाला आहे व ह्याच उपक्रमा अंतर्गत आर.टी.ओ.ऑफिस पासून ब प्रभाग क्षेत्र कार्यालय ते गगनगिरी पर्यंत 18 मीटर रुंदी चा नविन रोड तयार होणार आहे. तसेच ह्याच कामासाठी 5.50 कोटी रुपए (5,47,37,258 रुपए) मंजूर करण्यात आहे आहेत व ह्या संबंधी माहिती चे मोठे बोर्ड बिर्ला कॉलेज, आरटीओ परिसरात लागले आहेत.

ह्या संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी बी के नगर मधील रहिवाशांनी प्रभाग 14 चे शिवसेना नगरसेवक व केडीएमसी सभागृह नेता श्री रवि पाटील यांची भेट घेतली. त्यांनी सांगितले कि बिर्ला कॉलेज, भोईर वाडी, आरटीओ, सह्याद्री नगर, बी के नगर व ब प्रभाग क्षेत्र कार्यालय ते गगनगिरी पर्यत नविन रोड बनविण्यात येणार आहे. ह्या संबंधी मार्किग चे काम सुरु आहे. ज्यांची घरे रोड मध्ये जात आहे त्यांना केडीएमसी नोटिस पाठविणार आहे व त्यानंतर रोड मध्ये येणारी घरे तोडण्यात येतील. तसेच तोडण्यात येणारी घरे परत मिळविण्याकरिता त्या घरांच्या मालकांनी योग्य कागदपत्रे घेऊन केडीएमसी कडे अर्ज करावा. केडीएमसी ने एक समिति नेमली आहे ती समिति त्याबद्दल उचित निर्णय घेईल.

त्याच बरोबर बी के नगर मधील रहिवाशांनी प्रभाग 3 चे मनसे नगरसेवक श्री उल्हास भोईर यांची देखील तातडीने भेट घेतली. तेव्हा त्यांनी सांगितले कि 18 मीटर रस्ता बनणार आहे ही माहिती पूर्णपणे सत्य आहे, परंतु जेव्हा ह्या रस्त्याचे प्लानिंग बद्दल केडीएमसी मध्ये ठराव मंजूर झाला होता त्यावेळी मी पूर्णपणे ह्या ठरावास विरोध केला होता. कारण 18 मीटर रुंदीचा रस्ता बनविण्याच्या उपक्रमात 20-30 गोरगरिबांची घरे तोडून विकास करणे, हे तर मला अजिबात पटत नव्हते. मी तेव्हा देखील विरोध केला होता आणि आता देखील ह्या रस्त्याच्या उपक्रमाला पू्र्णपणे विरोध करत आहे. मी ह्या नगराचा नगरसेवक आहे म्हणूनच मी बी के नगर मधील रहिवाशांना न्याय देण्यासाठी सक्षम व समर्थ आहे. केडीएमसी ने रस्त्याची योजना आखण्यापूर्वी बी के नगर मधील स्थानिक रहिवाशांचे मत देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. एवढेच काय तर येथील स्थानिक रहिवाशांना हया रस्त्यामुळे काहीच फायदा होणार नाही.

सध्या बी के नगर जवळ आरटीओ ऑफिस आहे व त्यामुळे तेथे दिवसभर गाड्यांची धावपळ असते, परंतु हे ऑफिस लहान पडत असल्यामुळे ते ऑफिस भविष्यात आधारवाडी येथील हलविण्यात येणार आहे. असे देखील तेथील रहिवाशी बोलत आहे. त्यामुळे भविष्यात ह्या रस्त्याचा फायदा कोणाला होणार आहे. ह्याबद्दल तरी सध्या शंकाच आहे.

आर टी ओ ऑफिस पासून 18 मीटर रोड बनविताना कमीत कमी 20-30 घरे तोडण्यात येतील, कारण ही घरे रस्त्याच्या प्लानिंग मध्ये येणार आहे. असे तेथील रहिवाशी म्हणतात.

एवढचं काय तर 1996 साली देखील आर टी ओ ऑफिस ते बी के नगर चा रोड रुंद करण्यात आला होता, परंतु त्या वेळचे शिवसेना नगरसेवक श्री राजेंद्र देवळेकर यांच्या मध्यस्थीने बी के नगर मधील रहिवाशांना पूर्णपणे न्याय मिळाला होता. त्यावेळी रोड मोठा करताना घरे तोडण्यात आली होती व त्याच भागात पुन्हा नवीन घरे मिळाली होती.

बी के नगर मधील रहिवाशी बोलतात कि नवीन रोड बनविण्याच्या उपक्रमात काही चाळीतील घरे गेली तर केडीएमसी ने सर्वप्रथम जाणा-या घरांचे पुर्नवसन करावे व ह्यासाठी केडीएमसी ने घराचे रेजिस्ट्रेशन पेपर, विजेचे बिल, रेशनिंग कार्ड, निवडणूक कार्ड ह्यापैकी दोन-तीन ओळखपत्र मान्य करावे. त्याच बरोबर सध्या राहत असलेल्या घर मालकाला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करावा. जेणे करुन सध्या ज्या स्थितित रहिवाशी राहत आहेत, त्यांचे त्याच परिस्थितित पुर्नवसन झाले पाहिजे.


परंतु आता नवीन वर्षात म्हणजेच 2013 साला मध्ये काय होईल, ह्या बद्दल बी के नगर मधील सर्व रहिवाशां मध्ये नाराजगी चे वातावरण पसरले आहे. त्यांच्या मनात घरे तुटण्याची भिति उत्पन्न झाली आहे.